Type Here to Get Search Results !

चांदण्याची छाया कापराची काया | Chandanyachi Chhaya Lyrics

0
Song - Chandanyachi Chhaya Kaparachi Kaya
Lyrics by - Vaman Dada Kardak 
Album - Navkoticha Raja
Singer - Pralhad Shinde
Music by - Anand Shinde
Music Label - T- series
Release Date - 


चांदण्याची छाया कापराची काया | Chandanyachi Chhaya Lyrics



चांदण्याची छाया कापराची काया
चांदण्याची छाया, कापराची काया
माऊलीची माया होता, माझा भीमराया

चोचीतला चारा, देत होता सारा
आईचा उबारा देत होता सारा ;
भीमाईपरी चिल्यापिल्यांवरी
पंख पांघराया होता, माझा भीमराया

बोलतात सारे, विकासाची भाषा
लोपली निराशा आता लोपली निराशा;
सात कोटी मधी, विकासाच्या आधी
विकासाचा पाया होता, माझा भीमराया

झाले नवे नेते, मलाईचे धनी
वामनच्या मनी येती जुन्या आठवणी;
झुंज दिली खरी, रामकुंडावरी
दगड गोटे खाया होता, माझा भीमराया


चांदण्याची छाया कापराची काया | Chandanyachi Chhaya Video Song
Video Song



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या