Type Here to Get Search Results !

हंस हा कुणाचा | Hans Ha kunacha Bheem geet Lyrics

1

Hans Ha kunacha | हंस हा कुणाचा
Image Source-Google | Image by -www.jiosaavn.com

Song - Hans Ha kunacha 
Lyrics - kundan kambale 
Album- Vani Aika ho buddhachi 
Singer - Milind Shinde 
Music by - Pralhad Shinde 
Music Label - Venus
Release Date - 6 April 1990

हंस हा कुणाचा | Hans Ha kunacha

लागला अचानक एका हंसाला बाण
धरणीवरी कोसळला घायाळ तो हैराण
थरथरतो धडपडतो स्व वाचवाया प्राण
तळमळतो विव्हळतो जीव तो लहान
हंस हा कुणाचाहंस हा कुणाचा
हंस हा कुणाचा.....

युवराज सिद्धार्थाने हंसाला पाहिले
त्याक्षणी त्याठिकाणी ते धावूनी गेले
उचलीले लगबगीने त्या पाणी पाजिले
हळूच बाण काढूनी औषध लाविले
इतक्यात देवदत्त चुलत भाऊ तो आला
सिद्धार्थाकडे पाहूनी त्या राजहंसाला
शिकार आहे माझी दे हंस तो मला
धनी मी आहे त्याचा मीच बाण मारिला
हंस हा कुणाचाहंस हा कुणाचा
हंस हा कुणाचा......

अरेरेरे देवदत्ता तू काय हे केले
मुक्या जीवाला मारून तू काय साधिले
बघ मृत्यूच्या जबड्यातूनी मी त्याला सोडिले
त्वा मारिले परंतु मी त्यालाच रक्षिले
उपदेश हा मला तू नको शिकवू गौतमा
मला हे तत्त्वज्ञान नको सांगू गौतमा
शिकार करणे क्षत्रियांचा धर्म गौतमा
माझ्या शिकारीवर माझा हक्क गौतमा
हंस हा कुणाचाहंस हा कुणाचा
हंस हा कुणाचा.....

वादाने वाद दोघात अधिक पेटला
प्रश्न तो अशक्य सुटेनासा वाटला
मग राजापुढे जाऊनी हा प्रश्न मांडिला
म्हणती या दरबारात द्या न्याय हो मला
शुद्धोदन राजाने विचार करुनी
ठाम निर्णय न्यायाचा टाकिला देऊनी
मारणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ तारणारा धनी
हा हंस सिद्धार्थाचा सांगितले पटवूनी
हंस हा कुणाचाहंस हा कुणाचा
हंस हा कुणाचा.....

सिद्धार्थाने हंसाला त्या जीवदान दिले
भयभीत विहंगाला त्या मुक्त सोडिले
भरारी घेत स्वैर ते गगनास उडाले
किती हो समाधान गौतमास लाभले
समता बंधुभाव शांती करुणासागर
गौतम बुद्ध धन्य जगी झाले अजरामर
ते धम्मज्ञान भूषण क्रांतीचे आगर
कुंदन करी वंदन दोन्ही जोडूनिया कर
हंस हा कुणाचाहंस हा कुणाचा
हंस हा कुणाचा.....

VIDEO SONG

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की कमेंट करून आम्हाला कळवा
हमारी यह कोशिश आपको अच्छी लगी तो कृपया नीचे कमेंट करके हमारा हौसला बढाये