Type Here to Get Search Results !

चैत्यभूमीवरती जाऊ चला चला रे | Chaityabhumi Var jaau Chala Re

0
Song - 
Lyrics by - 
Album- 
Singer - 
Music by - 
Music Label - 
Release Date -

चैत्यभूमीवरती जाऊ चला चला रे | Chaityabhumi Var jaau Chala Re


चैत्यभूमीवरती जाऊ चला चला रे
त्या चैत्यभूमीवरती जाऊ चला चला रे
उठा बौद्ध जण भगिनी भाऊ चला चला रे

निर्वाण दिन भीमाचा आहे सहा डिसेंबर
भीमरूप जाहलेला आहे तिथेच सागर
अश्रूफुले त्या जागी वाहू चला चला रे
त्या चैत्यभूमीवरती जाऊ चला चला रे
 
विझली चिता परंतु ती ज्योती ना निमाली
होऊनि ज्ञान ज्योती हृदयात कोटी आली
नयनात ती प्रतिमा पाहू चला चला रे
त्या चैत्यभूमीवरती जाऊ चला चला रे

सर्वास सोबती घ्या कोणी ना राहो मागे
जयभीम गर्जनेने करूया जनास जागे
श्रद्धा ही अंतरीची दावू चला चला रे
त्या चैत्यभूमीवरती जाऊ चला चला रे

देऊन स्फूर्ती अविरत घडविले श्रेष्ठ जीवन
प्रशांत वातावरणी घेऊन भीमदर्शन
कीर्ती तयांची आठवत राहू चला चला रे
त्या चैत्यभूमीवरती जाऊ चला चला रे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या