Lyrics by - Sunil Khare
Album- Tula Bhiman Banaval Wagh
Singer - Anand Shinde
Music by - Harshad Shinde
Music Label - T-Series
तुला भिमानं बनवला वाघ लिरिक्स | TULA BHIMAN BANAVAL VAGH LYRICS
लई श्रमानं परिश्रमानं
सुखाचा करून त्याग
तुला भिमानं बनवला वाघ
का फिरतोस लांडग्यामागं
नुसता दिसाया दिसतो
तू भीम अनुयायी
तुझी डरकाळी कानी
कधी पडत नाही
अंग झटकून उठ गर्जून
का घेतोस बकरीचं सोंग
तुला भिमानं बनवला वाघ...
तुझ्या अंगात आहे
त्या वाघाची खाल
दे डरकाळी ऐसी
आता जबडा खोल
लांबसडक घे तू झडप
वैऱ्याची भागमभाग
कर वैऱ्याची भागमभाग
तुला भिमानं बनवला वाघ...
असा पिंजऱ्याचा कैदी
तू होऊ नको रं
त्या सर्कसवानी
गोल फिरु नको रं
उठ वीरा तू
भीम नरा तू
दाखव क्रांतीची आग
तूझी दाखव क्रांतीची आग
तुला भिमानं बनवला वाघ...
तुझ्या हाती असूदे
निळा झेंडा भीमाचा
लाव कपाळी आता
निळा टीळा भीमाचा
भीम विचार तू
कर साकार तू
घडी घडी सुनील सांगं
तुला घडी घडी सुनील सांगं
तुला भिमानं बनवला वाघ...
VIDEO : FULL ALBUM
तुला भिमानं बनवला वाघ लिरिक्स | TULA BHIMAN BANAVAL WAGH
आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की कमेंट करून आम्हाला कळवा
हमारी यह कोशिश आपको अच्छी लगी तो कृपया नीचे कमेंट करके हमारा हौसला बढाये