Kumbhara pari tu bhima is sung by Prakashdip Wankhade, Amaravati in album Chanddrama Rama Chandani released on 2010. He is the original singer of this song.
Song - Kumbhara pari tu bhima
Lyrics by - Amrut BagdeAlbum- Chandrama Rama Chandani
Singer - Prakashdip Wankhade
Music by - Vikas borkar & Bhupesh Sawai
Music Label - B -Series
Release on - 2010
कुंभारापरी तू भीमा | Kumbhara pari tu bhima Lyrics
कुंभारापरी तू भीमा, समाजाला घडविले
धिक्कारुन गुलामीला ,बुद्धाकडे वळविले..
बावीस प्रतिज्ञेची, भीमा तू दीक्षा दिली
बुद्धाच्या विचारांची, भीमा तू भिक्षा दिली
प्रगतीच्या शिखरावरी, आम्हाला चढविले
जीवन उद्धरले, पाळताना पंचशीला
झोपडीच्या जागी आता, दिसू लागला बंगला.
लाचारी-गरीबीला, तूच दूर पळविले
दरवाजे केले खुले, शिक्षणाच्या भवनाचे
दूध आम्हा पाजियले, गुरगुरत्या वाघिणीचे.
तुझ्या कष्टापायी भीमा, खूप काही मिळविले
बुद्धाच्या धम्माने, केली लई नवलाई
धम्माकडे वळले, भीमा तुझे अनुयायी
सर्व पोटजातीला, अमृताने जुळविले
Video Song - Kumbhara pari tu bhima

जयभीम 🙏 खरंच आपला हा स्तुत्य उपक्रम आहे आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🌹🌹
उत्तर द्याहटवाJai bhim
उत्तर द्याहटवाThanks । खूप छान सर
उत्तर द्याहटवाअतिशय सुरेख आणि चांगल्या प्रकारे गायण केले आहे खुप चांगले वाटले सर..
उत्तर द्याहटवामनापासून जय भीम सर..🙏
आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की कमेंट करून आम्हाला कळवा
हमारी यह कोशिश आपको अच्छी लगी तो कृपया नीचे कमेंट करके हमारा हौसला बढाये